esakal | पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करा, जयंत पाटलांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जयंत पाटील. यावेळी उपस्थित कार्यकर्ते. (छायाचित्र - योगेश गौतम)

पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करा, जयंत पाटलांचे आवाहन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : येत्या काळात पुर्ण ताकदीने पक्ष वाढवायचा आहे. यासाठी अधिक संघटीत होणे गरजेचे असून परभणी (Parbhani) जिल्ह्यातील परिस्थिती बदलण्यासाठी पक्षा कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शुक्रवारी (ता.24) केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा (Rashtrawadi Pariwar Sanwad Yatra) तिसऱ्या पर्वाची प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.24) परभणीपासून सुरुवात केली. राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीस त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला खासदार फौजिया खान (Fauzia Khan), जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार विजय भांबळे, माजी महापौर प्रताप देशमुख, राजेश विटेकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Beed Rain : केजमध्ये मुसळधार पाऊस, 'मांजरा'चे बारा दरवाजे उघडले

पाटील म्हणाले, आगामी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर एकसंध राहणे गरजेचे आहे. तुम्हाला पक्षावर प्रेम असेल तर पक्ष वाढविण्यासाठी रक्ताचं पाणी केल्याशिवाय गत्यंतर नाही. पक्षाचा गाभा मजबूत करणे गरजेचे आहे. त्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्याला तयार करा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता विविध कार्यक्रम राबवत आहे. त्यामुळे मला खात्री पक्षाची संघटना मजबूत होईल. संघटना कशी वाढेल यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा, ठिकठिकाणी पक्षाच्या शाखा उघडा, कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या जिथे सत्तेत आहोत, तिथे लोकांची कामे करून द्या, सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जिथे विरोधात आहोत, तिथे लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करा असे ही ते म्हणाले.

loading image
go to top