Karmad News : अडीच हजारांच्या मानधनासाठी महिलांची परवड! दिवाळी तोंडावर ३०८ महिला कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत

दिवाळीचा सण जवळ आला असतानाही छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या ३०८ महिला कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मानधन थकीत आहे.
indian currency

indian currency

sakal

Updated on: 

- बाळासाहेब काळे

करमाड - दिवाळीचा सण जवळ आला असतानाही छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या ३०८ महिला कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मानधन थकीत आहे. अवघ्या अडीच हजार रुपयांच्या मासिक मानधनावर काम करणाऱ्या महिलांना घरखर्चासह सणाचा खर्च भागविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचे काम नियमित सुरू असताना मानधनासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागत असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com