औसा - गेल्या दोन दिवसांपासून औशाचे राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी शहरात असलेल्या अनेक समस्यांना धरून भाजपला टार्गेट केले आहे. शहरात मोकाट श्वानांचा झालेला सुळसुळाट आणि या श्वानांनी अनेकजण जखमी केल्याच्या कारणावरून अफसर शेख यांनी भाजपा हटाव औसा बचाव असा नारा देत 'भोंको' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.