esakal | माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर कोरोना पॉझिटिव्ह, फेसबुकवर दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Khotkar

शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा कोरोना अहवाल रविवारी (ता.१३) पॉझिटिव्ह आला आहे.

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर कोरोना पॉझिटिव्ह, फेसबुकवर दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा कोरोना अहवाल रविवारी (ता.१३) पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः फेसबूकवर पोस्ट टाकून माहिती दिली आहे.


मागील काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना कहर वाढला आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक जण आले असून रविवारी (ता.१३) शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची महिती श्री.खोतकर यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट टाकून दिली आहे.

दिलासा न मिळाल्यास रस्त्यावर उतरू, मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला सात दिवसांचा...

पुढील उपचारासाठी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार असल्याचे त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून माहिती दिली आहे. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे ही श्री.खोतकर यांनी या पोस्टमध्ये आवाहन केले आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)