esakal | माजी आमदार गजानन घुगे यांचे उपोषण मागे, कळमनुरीत कोविड केंद्रात रिक्त जागा भरण्याचे मिळाले आश्वासन

बोलून बातमी शोधा

file photo

उपचार केंद्रात आवश्यक असलेल्या औषधी साठा उपलब्ध असल्याची लेखी पत्र दिल्यानंतर माजी आमदार गजानन घुगे व त्यांच्या समर्थकांनी सोमवार (ता. १२) सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेतले.

माजी आमदार गजानन घुगे यांचे उपोषण मागे, कळमनुरीत कोविड केंद्रात रिक्त जागा भरण्याचे मिळाले आश्वासन
sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत असलेल्या कोविड समर्पित आरोग्य उपचार केंद्रात तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागेवर दोन तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तर या उपचार केंद्रात आवश्यक असलेल्या औषधी साठा उपलब्ध असल्याची लेखी पत्र दिल्यानंतर माजी आमदार गजानन घुगे व त्यांच्या समर्थकांनी सोमवार (ता. १२) सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेतले.

उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत असलेल्या कोविड समर्पित आरोग्य उपचार केंद्रांमध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे कारण देत या ठिकाणी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात व रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध असल्यानंतरही तज्ञ वैद्यकीय अधिकारी अभावी धूळ खात पडले आहे तालुक्यातील बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता आखाडा बाळापूर येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे या व इतर मागण्यासाठी माजी आमदार गजानन घुगे तालुकाप्रमुख रुपेश कदम अशोक संगेकर उमेश सोमानी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालय समोर आमरण उपोषण सुरू केले होते.

हेही वाचा - नांदेडकरांनो...विनाकारण रस्त्यावर फिरून जीव धोक्यात घालू नका - विशेष पोलिस महानिरीक्षक तांबोळी

उपोषण सुरु झाल्यानंतर तहसीलदार मयूर खेंगले, पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ आनंद मेने, यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. वैद्यकीय अधीक्षकांनी यासंदर्भात आरोग्य विभागातील वरिष्ठ मागण्या संदर्भात माहिती दिली त्यानंतर आरोग्य विभागाकडून प्रतिनियुक्तीवर असलेल्या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे मात्र तांत्रिक अडचणींमुळे ते रुजू होऊ शकले नाही त्यांच्याऐवजी हिंगोली येथील तज्ञ डॉ पुरुषोत्तम तोषनीवाल वसमत येथील भूलतज्ञ डॉ. पंडितराव शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली असून.

रुग्णांना आवश्यक असणारी सर्व औषधी रुग्णालयात उपलब्ध आहे तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय बाळापुर व निवासी आश्रम शाळा जामगव्हाण येथे कोविड केअर सेंटर उभारण्यासंदर्भात जिल्हा स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचे लेखी पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने यांनी माजी आमदार गजानन घुगे यांना दिल्यानंतर सुरु करण्यात आलेले अमरण उपोषण मागे घेण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे