- धनंजय शेटे
भूम - अखेर 'ई-सकाळ'च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दिनांक २ ऑगस्ट रोजी 'ई-सकाळ'मध्ये माजी आमदार राहुल मोटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये प्रवेश करणार ही बातमी अखेर खरी ठरली. अखेर ठरले तुतारी सोडून हातामध्ये पुन्हा एकदा घेणार घड्याळ!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून माजी आमदार राहुल मोटे ता. ५ रोजी तीन वाजता मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याचे सोशल मीडियावर बॅनर झळकत आहेत.