
परळी वैजनाथ : तालुक्यातील मोहा गावचे रहिवासी, माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. २८) त्यांच्या येथील तहसील परिसरातील निवासस्थानाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.