साडेचार क्विंटल गोमांस जप्त; इतवारा पोलिसांची कारवाई 

प्रल्हाद काबंळे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नांदेड : इतवारा पोलिस ठाण्याचे फौजदार नंदकिशोर सोळंके हे आपल्या पथकासह देगलूर नाका भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एमजीआर गार्डन परिसरातून मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकला. निळ्या प्लॅस्टीक बॅरेलमधून प्रतिबंधीत असलेले साडेचार क्विंटल गोमांस जप्त केले. पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. दहा) दुपारी चारच्या सुमारास केली. 

इतवारा ठाण्याच्या हद्दीत अवैध कत्तलखाने मोठ्या प्रमाणात चालतात. पोलिसांनी अनेक वेळा या भागात छापे टाकून लाखोंचे प्रतीबंधीत असलेले गोमांस जप्त केले होते. गोवंश हत्या बंदी कायद्याची नांदेड शहरात सर्वाधिक पायमल्ली होत असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होते. मागील काही दिवसापासून शहरातील अनेक मोकाट जनावरे ज्यात बैल, गाई हे बेपत्ता होत आहेत. याबाबत पोलिस अधिक्षकांना गोवंश पालकांनी निवेदनही देण्यात आले आहे.

फौजदार सोळंके हे आपल्या पथकासह आपल्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पथकानी एमजीआर गार्डन परिसरातील हैदरबागमधील मोहमद गफुर कुरेश शेख रहीम याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता विनापरवाना प्रतीबंधीत असलेले दोन लाखाचे साडेचार क्विंटल गोमांस आढळून आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी भेट दिली. पोलिसांनी मोहमद गफुर याला अटक केली. फौजदार नंदकिशोर सोळंके यांच्या फिर्यादीवरुन इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हे. तपास ते स्वत: करत आहेत. 
 
Web Title: Four and half quintals of beef seized; Itawara police action