नांदेड : वीज पडून चार जनावरे दगावली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कोकलगाव येथे वीज पडून दोन म्हशी व दोन गाई असे चार जनावरं ठार झाली. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

हणेगाव (तालुका देगलूर) : कोकलगाव येथे वीज पडून दोन म्हशी व दोन गाई असे चार जनावरं ठार झाली. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

शंकरराव हणमंतराव पाटील (रा. कोकलगाव) यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली दोन म्हशी व दोन गाई असे चार जनावरे दुपारच्या वेळी बांधून गुराखी घराकडे जेवण करण्यासाठी गेला. मुसळधार पाऊस व विजेचा कडकडाट होऊन जनावरांवर वीज पडून चार जनावरे दगावली. त्यामुळे एकूण एक लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी शंकर पाटील यांच्याकडून मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Animals Died after Lightning in Nanded

टॅग्स