Ghansangavi Crime : अपहरणानंतर गळा आवळून हत्या; चार आरोपी ताब्यात

जुन्या भांडणाच्या कारणावरुन गावठी कट्टा व कुन्हाडीचा धाक दाखवुन बळजबरीने केले अपहरण.
crime
crimeSakal
Updated on

घनसावंगी : कुंभार पिंपळगाव येथुन सुरेश तुकाराम आर्दड रा. राजाटाकळी ता. घनसावंगी यास ता. 28 जून रोजी रात्री 10.00 वाजेच्या सुमारास चौघा जणांनी मागील जुन्या भांडणाच्या कारणावरुन गावठी कट्टा व कुन्हाडीचा धाक दाखवुन एका पांढऱ्या चारचाकीमध्ये बळजबरीने टाकुन त्याचे अपहरण केले होते. सदर प्रकरणात दिनांक 29/06/2025 रोजी पोलीस ठाणे घनसावंगी येथे पोलीसांनी तात्काळ गुन्हा नोंद करुन लागलीच यातील अपहरण झालेला व्यक्ती व आरोपींचा शोध घेणे कामी वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथके रवाना केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com