IPL Betting : क्रिकेटवर सट्टेबाजी, चार जण अटकेत; तीन बुकी फरारी, शोधासाठी पोलिस पथक नांदेडला रवाना
Police Raid : आयपीएल क्रिकेटवरील सट्टेबाजी प्रकरणात चार जणांना अटक केली आहे, तर मुख्य तीन बुकी फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक नांदेडकडे रवाना करण्यात आले आहे.
जालना : आयपीएल क्रिकेट सामान्यांवर सट्टा घेणाऱ्या आणि लावणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर, मुख्य तीन बुकी फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक नांदेड येथे रवाना झाले आहे.