प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव - रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केरूर येथे रामा नारायण आरोटे यांच्या घरी २० दिवसापूर्वी चोरी झाली. या प्रकरणी तक्रार देण्याऐवजी त्यांनी भोंदू बाबाची मदत घेत चोरीचा संशय असलेल्या परमेश्वर कंठीराम राठोड यास थंडगार पाण्यात बुडवलेल्या तांदळाचा विडा खाण्यास दिला. यामुळे शरीराला व मनाला वेदना झाल्या.