अंबाजोगाई - लातूर रोडवरील वाघाळा पाटीजवळ मंगळवारी (ता.१०) सकाळी साडेसहाच्या सुमारास कार व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील तिघेजण जागीच ठार झाले. एकाचा स्वाराती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. घटनेतील सर्वजण कारेपूर (ता.रेणापूर) येथील आहेत.