दोन अपघातांत बीड जिल्ह्यात चौघे ठार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

संस्थेच्या शाळेवर शिक्षक असलेले प्रशांत दिगंबरराव कुलकर्णी (वय ३६, रा. लहुरी, ता. केज, हल्ली मुक्काम बीड) जिल्हा हद्दीवरील मानूर येथील चेकपोस्टवरील आपले कर्तव्य बजावून परतत असताना त्यांच्या कारला जीपने जोराची धडक दिली.

बीड : विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातांत रविवारी रात्री व सोमवारी चौघे ठार झाले. यात चेकपोस्टवर ड्युटी करणाऱ्या शिक्षकाचाही समावेश आहे. संस्थेच्या शाळेवर शिक्षक असलेले प्रशांत दिगंबरराव कुलकर्णी (वय ३६, रा. लहुरी, ता. केज, हल्ली मुक्काम बीड) जिल्हा हद्दीवरील मानूर येथील चेकपोस्टवरील आपले कर्तव्य बजावून परतत असताना रविवारी (ता. १४) रात्री त्यांच्या कारला जीपने जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दुसरा अपघात सोमवारी (ता. १५) बीड तालुक्यातील मांजरसुंभा परिसरात झाला. दुचाकीला (एमएच २३ एस ८१४६) समोरून भरधाव आलेल्या कारने (एमएच १२ जेझेड ६७२७) जोराची धडक दिली. यात गोरख बबन मोरे (वय ३०), बंकट बाबूराव मोरे (वय ५०) व संजय बाळू सोनवणे (वय ४०) (तिघेही रा. मसेवाडी, ता. बीड) हे तिघे ठार झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four killed in two accidents in Beed district

Tags
टॉपिकस
Topic Tags: