विनापरवाना सुपारीचा चार लाखांचा साठा जप्त !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

अन्न व औषधी प्रशासन परभणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भारत जर्दा व पान मटेरियल नारायण चाळ, स्टेशनरोड या दुकानाची तपासणी केली.

परभणी : विनापरवाना सुपारीपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे रिपॅकेजिंग करून विक्रीसाठी साठा करून ठेवणाऱ्या शहरातील भारत जर्दा व पान मटेरियल या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सोमवारी (ता.१३) धडक कारवाई करण्यात आली. यात चार लाख ३९ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा - होट्टल महोत्सवाची शुक्रवारपासून मेजवानी

अन्न व औषधी प्रशासन परभणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भारत जर्दा व पान मटेरियल नारायण चाळ, स्टेशनरोड या दुकानाची तपासणी केली. या दुकानात विनापरवाना पॅकेजिंग व्यवसाय करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. सुपारीपासून होणाऱ्या पदार्थांची पॅकेजिंग केली जात होती. या पदार्थावर कुठलाही अन्न परवान्याचा उल्लेख नसल्याचे तपासणीत आढळून आले. या पथकाने या ठिकाणी असलेला चार लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त श्री. वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे, अरुण तमडवार, राजू पेदापल्ली यांनी केली. 

विनापरवाना व्यवसाय; फौजदारी गुन्हा
विनापरवाना व्यवसाय करणे हे कायद्याने गुन्हा आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ नुसार सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना घेण्यात यावा. विनापरवाना व्यवसाय करणे हा फौजदारी गुन्हा आहे, असे आवाहन सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले आहे. 

 

हेही वाचा .....

सापडलेले सोने स्वस्तात देतो म्हणून लुबाडले
सोनपेठ : डोबाडी तांडा (ता. सोनपेठ) येथे रविवारी (ता. १२) सापडलेले सोने स्वस्तात देतो म्हणून एका व्यापाऱ्यास लुबाडले. याप्रकरणी एकास अटक केली असून पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नाशिक येथील व्यापारी मनोज नायर यांना आम्हाला सोने सापडले असून ते कमी किमतीत तुम्हाला देतो, असे सांगून आरोपींनी रविवारी (ता. १२) रात्रीच्या सुमारास डोबाडी तांडा (ता. सोनपेठ) येथे बोलावून घेतले. तसेच त्यांना नकली सोन्याचे नाणे दाखवून त्याच्याकडील रोख एक लाख ३३ हजार रुपये व अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण दोन लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच त्यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनोज माधव नायर यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिसांनी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका संशयितास अटक केली आहे.

हेही वाचा - पतंगोत्सव साजरा करा पण...जरा जपून !

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four lakh stocks of betel nut were seized !