Marathwada News : मराठवाड्याच्या मोसंबीला पसंती; पाचोडच्या बाजारपेठेत दररोज 500 टनाची आवक

Marathwada News: मात्र तुर्तास आंध्राच्या मोसंबीची आवक मंदावल्याने पाचोडसह मराठवाडया तील मोसंबीने मुसंडी मारली अन् बाजारात यांस दुपट्टीचा भाव मिळत आहे.
Marathwada News
Marathwada Newssakal
Updated on

पाचोड : चार महिन्यापूर्वी पाणीटंचाईमुळे बाजारपेठांसह सर्वत्र शेतीचे 'अर्थचक्र' रूतून रोजगाराचा प्रश्र उभा ठाकला होता,पाण्याअभावी सर्वत्र फळबागा संकटात सापडल्याने उत्पादनाअभावी मोसंबीच्या बाजारपेठा बंद पडल्या.शारिरिक श्रमावर पोट असणाऱ्यांसह मोसंबी उत्पादकांची फरफट झाली.

जूनच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्याने पाणीटंचाईत तग धरलेल्या बागांना नवसंजीवनी मिळून आंबा बहाराची फळे परिपक्व होण्यापूर्वीच विक्री साठी बाजारात येऊन बारा ते १८ हजार रुपये प्रतिटनाचा भाव मिळाला होता.त्यातच आंध्राची मोसंबी बाजारात आल्याने मराठवा डयातील मोसंबीचे दर कमालीचे घसरले होते.

मात्र तुर्तास आंध्राच्या मोसंबीची आवक मंदावल्याने पाचोडसह मराठवाडया तील मोसंबीने मुसंडी मारली अन् बाजारात यांस दुपट्टीचा भाव मिळून ओस पडलेली बाजारपेठ नव्या जोमाने सुरु होऊन मोसंबी उत्पादक, स्थानिक व परराज्यातील मजुरांनी गजबजून गेली. तुर्तास येथे दररोज पाचशे ते सहाशे टन मोसंबी विक्रीसाठी येऊन कोटयावधींची उलाढाल होत असल्याचे चित्र पाहवयास मिळते.

गेल्या दहा वर्षांपूर्वी येथे धुळे -सोलापूर महामार्गालगत मोसंबीची बाजारपेठ सुरू झाली, अन् परराज्यासह परदेशात जाणाऱ्या मोसंबीला हक्काची स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली. हजारो रिकाम्या हातांना हंगामी स्वरुपाचा रोजगार मिळून अनेक व्यापारी व पोट व्यापारी उदयास आले. मोसंबीतोडणीचा हंगाम मजूरासह व्यापाऱ्या साठी पर्वणीकाळच समजला जातो. तुर्तास आंबा बहाराचा हंगाम सुरू होऊन घराला घरपण अन् चार चौघांत मोठेपण मिळवून देणाऱ्या मोसंबीमुळे अनेकांना रोजगाराची वाट सापडली.'थेट' बाजारपेठेच्या अनभिज्ञते मूळे मोसंबी कोमेजली होती.

तुर्तास आंब्या बहाराची फळे तोडण्याचे काम परिसरात वेगाने सुरू आहे. येथे उभारण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय जागेवर चोपन्न नोंदणीकृत आडत दुकाना असून येथे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व अहमदनगर जिल्ह्यातील मोसंबी विक्रीसाठी येते. वाढती व्याप्ती व येथील मोसंबीची आवक पाहुन स्थानिक व्यापाऱ्यासह दिल्ली, आग्रा,बंगळूर, हैद्राबाद अहमदाबाद पुणे, अनंतपूरम येथील व्यापारी तळ ठोकून आहेत. या बाजारपेठेमुळे आंबट झालेली मोसंबी गोड बनली आहे.मागील पंधरवाड्या त आंध्राच्या मोसंबीची आवक वाढल्याने आंबा बहाराच्या फळांना तुर्तास बारा ते १८ हजार रूपये प्रति टनाचा भाव मिळाला.

मात्र आता मराठवाड्याच्या मोसंबीची स्पर्धक आंध्राची "किन्नू"ची आवक मंदावल्याने मराठवाड्याच्या मोसंबीने विविध बाजारपेठे त पसंती मिळविण्यासोबतच प्रति टन २५ ते सत्तावीस हजार रुपये प्रति टनाचा पल्ला गाठला असून दररोज येथे पाचशे ते सहाशे टन मोसंबीची आवक होत आहे. साधारणतः दहा ते पंधरा कोटीची उलाढाल होत आहे. महिनाभरात आंध्राची मोसंबी विक्रीसाठी बाजारपेठेत येवून पुन्हा मराठवाड्याच्या मोसंबीचे भाव घसरतील हे तितकेच खरे.

परराज्यातील मजुरांचे वर्चस्व : मोसंबीला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याने बागा उतरविण्यापासून प्रतवारी करून वाहन भरे पर्यंत हजारो मजूरांची गरज वाढली. बाजार पेठेत दोन हजारांवर मजूरांना रोजगार मिळण्यासोबतच शेकडो वाहनधारक, वजनकाटा चालकांनाही हक्काचा रोजगार उपलब्ध झाला. तुर्तास दररोज पाचशे ते सहाशे टन मोसंबीची आवक होऊन दहा - बारा कोटीवर रुपयांची प्रतिदिवस उलाढाल होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीलाही यातून उत्पन्न सुरु झाले.

दररोज या बाजार पेठेत व्यापारी खरेदी केलेल्या मोसंबीचे ४० ते ५० ट्रक्स दिल्ली, आग्रा, बंगळूर, हैदराबाद, मथूरा, कानपूर, अहमदाबाद, बनारस,जयपूर,कलकत्ता,पुणे ,गोरखपुर, मुरादाबाद, जोधपूर, मेरठ आदी ठिकाणी पाठविले जातात.

Marathwada News
Marathwada Crime: कापूस खरेदी- विक्रीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची १२ कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल !

एका ट्रकमध्ये १६ ते २० टन मोसंबी भरण्यात येते.मोसंबी झाडांवरून उतरविण्यापासून ते गाडी भरण्यासाठी मजुरांना एक हजार रूपये प्रति टनाप्रमाणे मजूरी दिली जाते. तोलाई करण्यासाठी वजन काटयावाल्याकडून लहान वाहनास ५० तर मोठ्या वाहनाकडून १०० रुपये शुल्क आकारले जाते. नुकताच सुरू झालेला हा हंगाम आठ महिने अव्याहतपणे तर कधी मोसंबीच्या उपलब्धतेपर्यंत चालणार आहे.हा हंगाम सर्व बेरोजगारासाठी पर्वणीकाळ असणार आहे.

सुनिल बनसोडे (व्यापारी, गाळा क्रमांक २२): "आंध्राच्या मोसंबीची आवक घटल्याने मराठवाड्याच्या मोसंबीला चांगले दिवस आले.मोसंबीची आवक कमालीची वाढल्याने हजारो जणांना हक्काचा रोजगार मिळाला, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहने मंडीत गजबज असते. मृग व अंबिया बहाराची फळे संपेपर्यंत अर्थात दहा महीने हा हंगाम चालतो."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()