

Rescued! Infant Sold Four Times Across States Recovered by Mukundwadi Police
छत्रपती संभाजीनगर : केवळ एक महिन्याच्या पोटच्या गोळ्याला एक लाख वीस हजार रुपयांत विक्री करून जन्मदात्रीने २५ हजार रुपयांचा मोबाइल, ६२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे बाळाच्या विक्रीतून नफा कमवत हे बाळ पुढे तीन दलालांनी तीनवेळा विक्री केले. शेवटच्या विक्रीत हे बाळ तेलंगणमध्ये पोचले. या घटनेचा धागादोरा जुळवित मुकुंदवाडी पोलिसांनी तेलंगणमध्ये जाऊन बाळ ताब्यात घेतले आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला.