
मित्राचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्यांची ऑटो आणि राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परची समोरासमोर धडक झाल्याने ऑटोतील चार युवक जागीच ठार झाले.
अंबाजोगाई (जि.बीड) : मित्राचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्यांची ऑटो आणि राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परची समोरासमोर धडक झाल्याने ऑटोतील चार युवक जागीच ठार झाले. गंगाखेड-परळी मार्गावरील करम (ता.सोनपेठ) गावाजवळ रविवारी (ता.१३) रात्री सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथील विवाह सोहळा आटोपून गंगाखेड-परळी रस्त्याने परत परळीमार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या रियर ऑटोला (एमएच २३ टीआर ३११) परळीकडून राख घेऊन गंगाखेडकडे येत असलेल्या हायवा ट्रकने (एमएच २२ एएन ५१२१) समोरासमोर जोराची धडक दिली.
या अपघातात ऑटोचा चुराडा होऊन ऑटोतील विशाल बागवाले (वय २०), दत्ता भागवत सोळंके (२५), आकाश चौधरी (२३), ऑटो चालक मुकुंद मस्के (२२, सर्व, रायगडनगर, रा. अंबाजोगाई) हे चार तरुण जागीच ठार झाले आहेत. या अपघातामध्ये येथील रायगडनगरमधील रहिवासी असलेल्या चार युवकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रायगडनगर परिसरात शोककळा पसरली होती.
संपादन - गणेश पिटेकर