'महिंद्रा फायनान्स'ची २२ लाखांची फसवणूक, २२ जणांवर गुन्हे दाखल

महिंद्र रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
महिंद्र रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

वसमत (जि.हिंगोली) : बनावट नमुना क्रमांक ८ व सातबारा आधारे गृहकर्ज घेऊन महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड (Mahindra Rural Housing Finance Limited), वसमत (Vasmat) शाखा यांची २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वसमतच्या शहर पोलिस ठाण्यात या वित्तीय संस्थेच्या (Crime In Hingoli) सहा माजी कर्मचाऱ्यांसह २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ता.१ जानेवारी २०१७ ते ४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत अविनाश मल्लिकार्जुन कासेवार, बी.एस गायकवाड (दोघे रा.वसमत), प्रदीप लोंढे (रा. लाख,ता.औंढा), यशवंत मदनराव मुठाळ पाटील, गजानन ननगारे (दोघेही रा.कळमनुरी), हेमंत करुमभट्टे (रा.नांदेड), गंगाप्रसाद भारत भोकरे (रा.पुयणी,ता.वसमत), प्रकाश कदम, भगवान सुदाम हिवाळे, कोंडिबा मारोती अंभोरे , एकनाथ राजाराम डोहरे, नवनाथ राजाराम डोहरे, भिमराव तुकाराम हिवाळे, देवराव नागोराव हिवाळे, गोविंद इंद्रप्रसाद हिवाळे, रामदास नामदेव जामगे, निळकंठ बबन जामगे , दत्ता पंडित शिंदे, गजानन रंगनाथ अंभोरे, चांदजी गंगाधर हिवाळे (सर्व रा.पुयणी बु.) नारायण मारोती अंभोरे (सातेफळ) व बालाजी सुदामा हिवाळे (पुयणी बु.) यांनी संगनमत करून महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लि. शाखा वसमत येथून गृहकर्जाचे वाटप करत असताना नमुना क्रमांक ८ व सातबाराचे उतारे बनावट तयार करुन दुय्यम निबंधक कार्यालयात कंपनीच्या नावाने नोंदणीकृत करून तयार करुन दिले आहे.

महिंद्र रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
PSI होण्याचे स्वप्न अधुरे, विद्यार्थ्याचा हृदयविकाराने निधन

सदरील कर्ज प्रकरणात बनावट व खोटे कागदपत्र सादर करुन फायनान्स कंपनीची २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी फायनान्स कंपनीचे विधी अधिकारी मो. मोईजपाशा अब्दुल अजीज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात वरील २२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री.बर्गे करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com