
सेलू : तुमच्या नावे कॅनरा बँकेत बनावट खाते उघडण्यात आले असून या खात्यात बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांत तुमच्यावर गुन्हा झाला. तसेच सीबीआय कडून वाॅरंट निघाले आहे. असे खोटे सांगून सेलू शहरातील सेवानिवृत्तीचे काही वर्ष सेवा राहीलेल्या बँक उपप्रबंधक गिरीश सोमण यांच्याकडून अज्ञात इसमाने ७९ लाख ७६ हजार रुपये लुबाडणूक करून उकळले.