
जालना : एक लाखाचे एक कोटी रुपये करतो म्हणून गंडा घालणाऱ्या भोंदू बाबा रतन आसाराम लांडगे (वय ४५, रा. भक्तेश्वरनगर, जालना) याच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात अजून एक गुन्हा दाखल झाला. चिखली (जि. बुलडाणा) येथील एका व्यक्तीला तब्बल ४६ लाखांना गंडा घातला होता. दरम्यान, संशयित लांडगे पोलिस कोठडीत आहे.