Jalna News : स्टील कंपनी हडपण्याचा प्रयत्न; बनावट करारनामा, जालन्यात तिघांवर गुन्हा दाखल
Business Fraud : जालन्यातील राठी स्टील कंपनी हडपण्याच्या उद्देशाने बनावट करारनामा केल्याच्या आरोपावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
जालना : राठी स्टील कंपनीसाठी औद्योगिक वसाहत येथे जागा किरायाने दिल्याचा बनावट करारनामा करून सळई कंपनी हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १२) सायंकाळी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.