छत्रपती संभाजीनगर : मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंद असल्याचे खोटे सांगत तरुणाला सायबर भामट्यांनी धमकावले. शिवाय आपण मुंबई पोलिस असल्याची बतावणी करून डिजिटल ॲरेस्ट करीत २७ लाख रुपये उकळले. याप्रकरणी अनोळखी आरोपींविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.