‘या’ जिल्ह्यात दीड लाख कुटुंबांचे ‘कल्याण’!

file photo
file photo
Updated on

परभणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ वाटपास जिल्ह्यात प्रारंभ झाला असून प्रति लाभार्थी पाच किलो तांदूळ देण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४१ हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे वाटप पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

मोफत तांदूळ वाटपास प्रारंभ झाला असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. मोफत तांदूळ वाटपात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत मोडणाऱ्या कार्डधारकांनाच धान्य देण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी सहा हजार मेट्रिक टन तांदूळ प्राप्त झाला आहे. स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थींना तीन हजार ५७७ मेट्रिक टन धान्य वितरीत करण्यात आले आहे. तसेच टप्प्याटप्प्याने तांदूळ वाटप करण्यात येत आहे.

लाभार्थींना वाटपाची सूचना देणे बंधनकारक
मोफत तांदूळ वाटप चालू होत असताना प्रत्येक गावात तशी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. कोणते धान्य नियमित आहे व कोणता तांदूळ मोफत देण्यात येत आहे, याची नागरिकांना सूचना देणे आवश्यक आहे. नाही तर नियमित धान्य वाटप व मोफत तांदूळ वाटपात गोधळ होऊ नये यासाठी गावातील ग्राम दक्षता समिती तसेच शासकीय प्रतिनिधी, जागरूक युवकांनी व नागरिकांनीसुद्धा याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा -​ रस्त्यावर उतरून सेवा देणारा हरहुन्नरी क्रीडा शिक्षक


‘एपीएल’साठी कमी भावाने धान्य
जिल्ह्यातील उर्वरित एपीएल केशरी शिधापत्रिका ७८ हजार ११९ असून त्यावरील तीन लाख ३६ हजार ७७१ लाभार्थींसाठी मे व जून या दोन महिन्यांसाठी प्रति माहिना गहू १०१० मेट्रिक टन व तांदूळ ६७४ मेट्रिक टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. हे धान्य प्रति लाभार्थी तीन किलो गहू आठ रुपये प्रति किलो दराने व प्रति लाभार्थी दोन किलो तांदूळ १२ रुपये प्रति किलो दराने मे व जून या दोन महिन्यांत रास्तभाव दुकानदारांमार्फत लाभार्थींना वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ९० टक्के धान्य वाटप
परभणी जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत ४३ हजार ८७९ पात्र शिधापत्रिकाधारक असून प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दोन लाख पाच हजार ६०५, तर एपीएल शेतकरी योजनेत ५६ हजार १९६ पात्र शिधापत्रिकाधारक आहेत. या तीनही योजनांसाठी पात्र कार्डधारकांची एकूण संख्या तीन लाख पाच हजार ६८० इतकी असून त्यावरील लाभार्थी संख्या १४ लाख ५२ हजार ९३२ इतकी आहे. नियमित धान्य वाटप जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. सहा हजार १५० मेट्रिक टन धान्य पात्र लाभार्थींना वितरीत करण्यात आले आहे.

..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Aadul Theft
Teachers Agitation
tushar jadhav
Protest outside the Tehsil office
Marathi News Esakal
www.esakal.com