
अंबड : जालना जिल्हयातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय (ता.8 एप्रिल 2025) व (ता.30 एप्रिल 2025) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुक्यातील पात्र घरकुलधारकांना पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी (ता.26) तहसिल कार्यालयात बदनापूर विधान सभेचे आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी तहसिलदार विजय चव्हाण, गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत, पालिकेचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे,