नांदेड जिल्ह्यात ‘या’ प्राण्यांचा उन्माद 

file photo
file photo

नांदेड : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. किनवट, माहूर तालुक्यातील वनक्षेत्रामधील गावशिवारात एक आठवड्यात वेगवेगळ्या तीन हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

माहूर तालुक्यात एकाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यात माहूर शहर परिसरात कापुस वेचणीनंतर घरी परतताना रविवारी ता.एक डिसेंबरला मोहम्मद शकील मोहम्मद जलाल यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. किनवट तालुक्यातील चिखली (बु.) येथील शेख जावेद शेख मुबारक यांच्यावर गुरूवारी (ता.पाच) तर आमडी (ता.किनवट) येथील भुजंग अंतु पेदोरे यांच्यावर रविवारी (ता. आठ) अस्वलाने हल्ला केला. दरम्यान, एका आठवड्यात अस्वलाच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्याने शेतकरी, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

बेसावध शेतकरी प्रतिकार करण्यास पडतात कमी


शेती कामात व्यस्त असलेल्या बेसावध शेतकऱ्यांवर जवळच दबा धरुन बसलेले अस्वल अचानक हल्ला चढवत असल्याने जखमी अवस्थेत प्रतिकार करणे कठीण होते. जोराच्या धडकेने जमिनीवर कोसळणाऱ्या नागरिकांच्या अंगावर बसुन अस्वल थेट डोळ्यांवर हल्ला चढवतात. अचानक हल्ल्यामुळे बेसावध नागरिकांची प्रतिकारक्षमता मंदावल्याचा फायदा हल्ला करताना अस्वल घेतात.
वनक्षेत्रात अस्वलांचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी एकट्याने बाहेर पडणे कठीण झाले आहे. 

हेही वाचा-  सुशिक्षित बेरोजगारांना फसवणारा जेरबंद


वनविभागाची कुचकामी यंत्रणा

किनवट, माहूर तालुक्यातील वनक्षेत्राच्या गावखेड्यांमधील जंगल, गाव शिवारामध्ये अस्वलांचा वावर आहे. जंगलात वावरणाऱ्या वन्यप्राण्यांचे शेतकऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या सहा महिन्यात चार शेतकऱ्यांवर अस्वलांचे हल्ले झाले आहेत. जंगलातील गावशिवारामध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना जागृती संदर्भात प्रशिक्षण दिले. शेतामध्ये काम करताना आसपास वन्यप्राण्यांची चाहूल लागताच सुरक्षित स्थळ अथवा त्यांचा सामना होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा सल्ला वनविभागाकडून शेतकऱ्यांना सातत्याने देण्यात येत आहे. पण इतर वन्यप्राण्यांच्या किनवट, माहूर तालुक्यात अस्वलांच्या हल्ल्यामध्ये झाल्याचे रविवारी घडलेल्या तिसऱ्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. 

एकट्याने बाहेर पडणे कठीण

सध्या रब्बी पिके जोमात असून खरिपातील कापुस वेचणीची सुगी जोरात आहे. रब्बी पिकांना पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांना वेळी अवेळी शेतात जावे लागते. कापुस वेचणीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना जीव मुठीत धरुन शेताची वाढ धरावी लागत आहे. जंगलातील अस्वलांनी शेतीक्षेत्राकडे मोर्चा वळविल्याने शेतशिवारात हमखास अस्वल दिसून येत आहे. विशेष म्हणजे कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांवर अस्वल बेसावध अवस्थेत हल्ला चढवतात. त्यामुळे कामासाठी एकट्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. 

सहा महिन्यात चौथा प्रकार
  
किनवट, माहूर तालुक्यात जंगलातील गावशिवारामध्ये गेल्या सहा महिन्यात अस्वलाच्या हल्ल्याचे चार प्रकार घडले आहेत. रविवारी घडलेल्या घटनेसह तीन गंभीर जखमींसह दत्तमांजरी यथील दत्ता राठोड या शेतकऱ्याच्या मृत्युचा यामध्ये समावेश आहे. 

हल्ला प्रकरणी मदत

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमींसाठी एक लाख २५ हजार रूपये, किरकोळ जखमींना औषधोपचाराचा खर्च व मयताच्या वारसास पंधरा लाख रूपये मदत शासनस्तरावरुन देण्यात येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com