
वैजापूर : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आता पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढण्याची सूचना ग्रामविकास विभागाने दिली आहे. यापूर्वी ५ मार्च २०२५ च्या अधिसूचनेनुसार तीन महिन्यांपूर्वी सरपंचपदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पाच मार्चची अधिसूचना अधिक्रमित करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हानिहाय आरक्षण दिले असून यात प्रवर्गासाठी जागा निश्चित करून दिल्या आहेत. दरम्यान, ओबीसी पदांची संख्या कायम राहिली असून आरक्षणात मात्र बदल होणार आहे. त्यामुळे भावी सरपंचपदाची तयारी करणाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.