
गेवराई : वडिलांनी बांधकाम कामगार म्हणून काम करत मुलाच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही.वडिलांच्या कष्टाचे चीज करत बीडमधील गेवराईतील कृष्णा शिंदे यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने त्याची सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदासाठी निवड करण्यात आली आहे.