कळंब : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कष्टकरी बापाचं स्वप्न सकार करीत तीनं तिचं पोलीस होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. त्या दिवशी तिच्या घरात उत्सवाचं वातावरण होतं. तिच्या आईवडिलांचे मोबाईल शुभेच्छांच्या फोनने खणखणत होते. .वडील भावुक होत म्हणाले, "मला माझी मुलगी अश्विनी वर्दीत बघायची होती," माझं स्वप्न माझ्या मुलीने पूर्ण केलं. आधी तिची ओळख माझ्यामुळे होती, पण आता माझी ओळख तिच्यामुळे होईल. तिच्यावर विश्वास होता आणि तिने तो सार्थ ठरवलाय.10 जून रोजी अश्विनी सातपुते ही बीड पोलीस मुख्यलयात कार्यरत झाली आहे..कळंब शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत, किराणा दुकान आदी ठिकाणी हमाली करणारे ज्ञानेश्वर (माऊली) सातपुते यांनी एक स्वप्न पाहिलं होतं.आपल्या मुलीला मोठं करायचं, तिला पोलीस व्हायचं! स्वतःच्या घामाचे कण मोजणारा तो बाप, जेव्हा आपली मुलगी आश्विनी ला खाकी वर्दीत पाहतो, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अभिमानाचे अश्रू अनावर होतात.प्रत्येक बापाची हिच माफक पण मोलाची अपेक्षा असते – "मुलीने शिकून स्वतःचं स्थान निर्माण करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं!" आश्विनीने ही अपेक्षा पूर्ण करत, बापाच्या स्वप्नांना वास्तवाची डोळस किनार दिली आहे..ज्ञानेश्वर माऊलींनी अहोरात्र राबत, हमाली करत मुलीच्या शिक्षणाचा भार उचलला. दुसरीकडे आश्विनीनेही वडिलांच्या कष्टांची किंमत ओळखून, परिश्रमांची पराकाष्ठा करत पोलीस पद मिळवलं. तिचा दीक्षांत समारंभ नुकताच नागपूर येथे पार पडला. आणि त्याच क्षणी तिचे वडील – माऊली – गर्वाने फुलून गेले. पोलीस वर्दीतली आपली लेक पाहून त्यांच्या डोळ्यांतून अभिमानाचे अश्रू ओघळले.हा क्षण त्यांच्या आयुष्यातला 'सुवर्णक्षण' ठरला – जो ते कधीच विसरू शकणार नाहीत."मुलगी मोठी व्हावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी," हे प्रत्येक बापाचे स्वप्न असते. आश्विनीने ते खरं करून दाखवलं..आज माऊली सातपुते हे केवळ हमाल नाहीत, तर एका पोलीस लेकीचे अभिमानी वडील आहेत, आणि संपूर्ण गावासाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.शहरातील एका कष्टकरी, सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली अश्विनी आज पोलीस बनली आहे. तिचा प्रवास केवळ यशाचा नाही, तर जिद्द, चिकाटी, अपयशावर मात आणि वडिलांच्या स्वप्नासाठी झगडणाऱ्या मुलीचा आहे. तिचं हे यश ऐकून तिचे आई-वडील, शेजारी, नातेवाईक, आणि मित्र परिवार सगळेच भारावून गेलेत. तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते कारण हे केवळ तिचं नव्हे तर त्यांच्या स्वप्नाचंही यश होतं..Nagpur Crime : मध्यरात्री वृद्धावर फावड्याने हल्ला; नंदनवन भागातील घटना, सीसीटीव्हीत दोन जण कैद.ही यशोगाथा केवळ यशाची गोष्ट नाही तर ती प्रत्येक पालकासाठी एक प्रेरणा आहे. आपल्या मुलांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक तरुण-तरुणीसाठी ही एक शिकवण आहे. अपयश आल्यावर थांबू नका कारण यश तुमच्याही दाराशी येऊन उभं आहे. जरा अजून प्रयत्नांची गरज आहे. अश्विनी च्या यशात तिची मेहनत, तिच्या आईवडिलांचा विश्वास आणि योग्य मार्गदर्शनाचं उत्तम मिश्रण आहे. तिची कहाणी आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे कारण ती सांगते की, 'अपयश म्हणजे अंत नाही, तर नव्या यशाची सुरुवात असते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.