
छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मर्यादित भागात आरोग्याची सेवा तर करता येणार होती. परंतु, त्याहीपेक्षा मोठ्या समाजघटकासाठी आपण काम करायला हवे, या उद्देशाने एक युवक प्रयत्न करतो आणि दुसऱ्याच प्रयत्नात तो यूपीएससी परीक्षेत पाचशेवी रँक मिळवून बाजी मारतो. आकाश पुंजाराम गोरे असे पंचविशीतील या युवकाचे नाव.