National Chess Championship : माजलगावचा लहान खेळाडू वल्लभ कुलकर्णी बुद्धिबळ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर
National Chess Championship : मोगरा (ता. माजलगाव) येथील वल्लभ कुलकर्णीने राष्ट्रीय अंडर-७ बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत गावाचा आणि जिल्ह्याचा मान वाढवला आहे.
माजलगाव : तालुक्यातील मोगरा येथील वल्लभ अमोल कुलकर्णी हा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी राज्याकडून भुवनेश्वर ओरिसा येथील स्पर्धेत खेळत आहे. ३८ व्या अंडर ७ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तो सहभागी झाला आहे.