
गेवराई : कधी काळी अभ्यासाचे साथीदार असलेली पुस्तके, वही, पेन आणि मैदानावरच्या खेळाच्या गमती,जमती आजच्या संगणकीय युगात हरवत चाललेल्या आहेत. त्यांची जागा आता मोबाईल, टॅबलेट आणि ऑनलाईन गेम्सने घेतली आहे. मुलांमध्ये वाढत चाललेले मोबाईलचे व्यसन शिक्षण क्षेत्रासाठी चिंतेचा विषय बनले आहे.