shivam meind
sakal
भोकरदन - कष्टाला पर्याय नसतो आणि जिद्दीसमोर परिस्थितीही झुकते, याचा जिवंत दाखला भोकरदन शहरातील तरुण शिवम रमेश मैंद याने दिला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत तब्बल १३० गुण मिळवत रांगोळी, नारळ व फुलांची विक्री करणाऱ्या शिवमची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) निवड झाली आहे. भोकरदनच्या एका सर्वसामान्य कुटुंबातून देशसेवेपर्यंत पोचलेली ही यशोगाथा आज संपूर्ण तालुक्याच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.