
श्रीकृष्ण उबाळे
बीड : ‘जीवनामध्ये होईल तर सैन्य दलातील अधिकारी आणि देशसेवा करीन’, असे स्वप्न उराशी बाळगत फुलसांगवी (ता. शिरूर कासार) येथील आकाश रामदास गोर्डे या २४ वर्षीय तरुणाने सैन्य दलातील लेफ्टनंटपदी मजल मारली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या युवकाने मोठ्या जिद्दीने हे यश प्राप्त करत नावलौकिक केला आहे. सैन्य दलातील प्रथम श्रेणीतील अधिकारी असणारे हे पद असून अखिल भारतीय पातळीवर ५१० जणांच्या यादीमध्ये आकाशाने ४७ वा क्रमांक प्राप्त केला.