शेतकऱ्याने काढली किडनी विक्रीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

वाशीम : कर्जमाफीमध्ये माझे थकीत पीककर्ज अडकल्याने मला बॅंक कर्ज देण्यास तयार नाही. दुष्काळी मदतही मिळाली नाही. त्यामुळे बॅंक दरवाजात उभे करायला तयार नाही. त्यामुळे पेरणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पेरणीसाठी पैसे द्या, नाहीत माझी किडनी विकत घ्या... असा संतप्त सवाल मालेगाव तालुक्‍यातील वरदरी खुर्द येथील झिंगाजी काशीराम पंडित यांनी शासनाला केला आहे.

वरदरी खुर्द येथील झिंगाजी काशीराम पंडित यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे 52 हजार रुपये पीककर्ज थकीत आहे. त्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज देण्यास बॅंक तयार नाही. शासन एकीकडे शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ झाल्याचा डिंडोरा पेटवीत आहे. तर दुसरीकडे पीककर्ज अद्यापही माफ झाले नाही. त्यामुळे बॅंक दरवाजात उभी करायला तयार नाही. दुष्काळी मदतही भेटली नाही. कर्जापाई अगोदरच गुरे विकली आहेत. शेतही कोणी घ्यायला तयार नाही. सावकाराने नरडीचा घोड घेतल्यापेक्षा माझी किडनी विकत घ्या, आणि मला पेरणीसाठी पैसे द्या, असा संतप्त सवाल सवाल करत शेतकऱ्यांनी किडनीच विक्रीला काढली आहे. याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांना निवेदन दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: frustrated farmer ready to sale his kidney at Washim