

Monsoon Calamity: Sudden Gale Force Winds Topple Farm Shed Wall in Adgaon Khurd
Sakal
फुलंब्री : शेती आणि पशुपालनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका शेतकरी कुटुंबावर शुक्रवारी (ता.१२) रात्री आठ वाजेच्या दरम्यान काळाने घाला घातला. फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द येथे शेतातील शेडमध्ये बकऱ्या बांधत असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेडची भिंत कोसळून शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत पुतण्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.