भाजप सरकार चोरांचे साथीदार- डॉ.कल्याणराव काळे

fulambri
fulambri

माजी आमदार डॉ.कल्याणराव काळे : फुलंब्रीत काँग्रेस कार्यकर्त्याफुलंब्री- देशासह महाराष्ट्रातील जनता सध्याच्या सरकारवर नाराजी व्यक्त करुन प्रचंड आक्रोश करत आहे. परंतु, या सरकारला जनतेशी काही देणे घेणे उरलेले नाही. मोदींनी भ्रष्ट्राचार मुक्त भारत करण्यासाठी चौकीदार होण्याची संधी द्या, असे सांगून काळा पैसा भारतात आणून प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर पंधरा -पंधरा लाख रुपये टाकणार असल्याचे अमिष जनतेला दाखवले होते. तर राज्यात फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव देऊन सातबारा कोरा करु असे आश्वासन दिले होते. मात्र दोघांचेही आश्वासन हवेतच विरले असल्याने भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसुन, चोराचे साथीदार असल्याचे मत माजी आमदार डॉ.कल्याणराव काळे यांनी शुक्रवारी (ता.23) यांनी व्यक्त केले. 

तालुका काँग्रेस कमिटीची बैठक व काँग्रेस पक्षाच्या अखिल भारतीय सदस्य पदी डॉ.कल्याण काळे यांची निवड झाल्याने त्यांचा भव्य सत्काराचे आयोजन बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सदस्य सुदाम मते, बाजार समिती सभापती तथा तालुकाध्यक्ष संदिप बोरसे, देवगिरी कारखानाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आबाराव सोनवणे, उपाध्यक्ष रंगनाथ कोलते, जिल्हा परिषद सद्स्य किशोर बलांडे, पंचायत समिती सदस्या सविता पायगव्हाण, महिला तालुकाध्यक्षा सुनिता मारक, सरपंच छाया भिवसने, गंगाधर सोनवणे, अंबादास गायके, ज्ञानेश्वर जाधव, रऊफ कुरेशी, रज्जाक शेख, मुद्सर पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.  

दरम्यान, बोलतांना डॉ. काळे म्हणाले की, गेल्या चार वर्षात सुमारे 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यापैकी एकाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पंतप्रधानाना परदेश दौऱ्यातून वेळ नाही. आघाडी सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या व लाल्या रोगाचे अनुदान मिळवून देण्यासाठी मी स्वतः त्यावेळेस विधानसभेत आवाज उठविला होता. मात्र आता फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याच मतदार संघातील शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान देता आले नाही. त्यामुळे या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. तालुक्यातील शेतकरी अजूनही कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन प्रक्रियेत शेतकरी गुरफाटूनही अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. तालुक्यातील सुमारे 23 हजार शेतकार्यापैकी नऊ हजारच शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहे. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून शेतकऱ्यांचे हिताचा कोणताही निर्णय ठाम पणे अद्याप घेण्यात आलेला नाही. या शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे ध्येय धोरण तळागाळातील कार्यकर्त्याना सांगून काँग्रेस पक्षाचे हात बळकट करावे. आगामी येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षांची कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात पक्ष संघटन करून मोठी ताकद उभी करवी, जेणे करून शेतकरी विरोधी भाजप सरकारला घडा शिकविला जाईल.

याप्रसंगी बाबुराव डकले, त्र्यंबक नागरे, शामराव साळुंके, अमोल डकले, विजय जाधव, गोविंद गायकवाड, संतोष मेटे, कचरू मैद, रामेश्वर गाडेकर, विठ्ठल लुटे,सदाशिव विटेवर, मधुकर क्षीरसागर, मधूशेठ खामगावकर, राजेंद्र चव्हाण, गंगाधर मुळे, शेख रज्जाक, पुरुषोत्तम गाडेकर, सय्यद इफतेखार, कारभारी काटकर, मंगेश मेटे, पंडित पवार आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com