

Daily Election Expense Submission Made Mandatory
Sakal
फुलंब्री : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच दररोज निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना यांनी दिले आहेत. शनिवारी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.