esakal | हिंगोली जिल्ह्यातील रमाई आवास योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा- खासदार हेमंत पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यापूर्वी प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा हिंगोली, कळमनुरी, किनवट ,माहूर  येथील निधी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणला असून लाभार्थ्यांना निधीचे वाटप करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील रमाई आवास योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा- खासदार हेमंत पाटील 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह सेनगाव, कळमनुरी, औंढा, वसमत तालुक्यातील  नगरपरिषद आणि नगरपंचायत अंतर्गत रमाई आवास योजनेचा प्रलंबित निधी तात्काळ मंजूर करून उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

यापूर्वी प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा हिंगोली, कळमनुरी, किनवट ,माहूर  येथील निधी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणला असून लाभार्थ्यांना निधीचे वाटप करण्यात आले आहे.

मागासवर्गीय समाजातील सर्व सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीला आपल्या हक्काचे घर असावे या उद्देशाने केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मागासवर्गीय समाजासाठी माता रमाई आवास योजना सुरू केली आहे.

या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा येथील नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या अंतर्गत येणाऱ्या शहरी भागातील मागासवर्गीय वस्त्यांचा सर्व्हे करून मंजुरी देण्यात आली आहे. परंतू निधी मात्र अद्याप उपलब्ध झाला नसून मागील बऱ्याच दिवसापासून बांधकाम थांबले असून आणि लाभार्थी निधी पासून वंचित आहेत. याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्याकडे तक्रार दाखल होताच तातडीने या प्रकरणाचा पाठपुरावा करून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि  हिंगोली जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायत अंतर्गत प्रलंबित असलेला रमाई आवास योजनेचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा आणि लाभार्थ्यांना न्याय द्यावा.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image