esakal | यशोदामाता पुरस्कार वितरण सोहळ्यावर रोषाचे ग्रहण - कुठे ते वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जागतिक महिलादिनी रविवारी (ता. आठ मार्च २०२०) जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कर्तृत्ववान महिलांना यशोदामाता पुरस्कार वितरण सोहळ्याचे अयोजन करण्यात आले आहे. 

यशोदामाता पुरस्कार वितरण सोहळ्यावर रोषाचे ग्रहण - कुठे ते वाचा 

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड : जागतिक महिलादिनी रविवारी (ता. आठ मार्च २०२०) जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कर्तृत्ववान महिलांना यशोदामाता पुरस्कार वितरण सोहळ्याचे अयोजन करण्यात आले आहे. 

महिला व बालाविकास विभागाच्या एकात्मीक बाल विकास प्रकल्पांतर्गत उल्लेखनीय कामकरणाऱ्या आंगणवाडी कर्मचारी, पर्यवेक्षीकांना साडी- चोळी, सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात येत आहे. दरम्यान, पुरस्कार निवडीपासून वितरण सोहळ्यापर्यंत अत्यंत गोपनिय पद्धतीने पार पाडला जाणारा कार्यक्रम यंदा नामांकित मंगल कार्यालयामध्ये आयोजीत करण्यात आला आहे. कार्यक्रम पत्रीकेत प्रोटोकॉल पाळण्यात आले नसल्याने होऊ घातलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमावर रोषाचे ढग घोंगावत आहेत. 

शासनाच्या माहिला व बालाविकास विभागांतर्गत एकात्मीक बालविकासच्या वतिने आंगणवाडीस्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या आंगणवाडी कर्मचारी, पर्यवेक्षीका यांना २००० पासुन यशोदा माता पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांना साडी- चोळी, सन्मानपत्र देवून गौरविण्यात येते.  यंदा जिल्हाभरातील ८० महिला कर्मचारी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. मात्र, महिला व बालकल्याण विभागामार्फत दरवर्षीच्या सन्मानीत महिला कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी कार्यालयात डकविण्याची अद्यापर्यंत तसदी घेण्यात आली नाही. या शिवाय निवड प्रक्रियेपासून पुरस्कार वितरण सोहळ्यापर्यंत अत्यंत गोपनियता बाळगण्यामागचे गौडबंगाल अद्यापर्यंत समोर आले नाही. 

येथे क्लिक कराअध्ययन निष्पत्तीत विद्यार्थी बनताहेत स्मार्ट, कसे ते बघाच

पुरस्कार प्रक्रियाच संशाच्या भोवऱ्यात
प्रत्यक्षात पुरस्कारासाठी निवड झालेल्या लाभार्थी महिलांची नावे किमान मुख्यालयात डकवणे सोईचे ठरत असले तरी; प्रशासनाकडून अद्याप तशी तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या निवड प्रक्रियेपासून पुरस्कार वितरण सोहळा संशायच्या भोवऱ्यात आहे. यंदा मोठा गाजावजा करत जागतीक महिलादिनी मोठा गाजावाजा करत शहरातील एका नामांकीत मंगलकार्यालयामध्ये यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे अयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मातब्बरांच्या उपस्थितीत आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमपत्रिकेवर दोन खासदारांसह भाजपच्या आमदारांची नाव नसल्याने कार्यक्रमावर प्रोटोकॉलचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) एस. व्ही. शिंगणे आदींची नावे पत्रिकेत आहे. 

हेही वाचा -  गृहिनींमध्ये का आहे तीव्र नाराजी, ते तुम्ही वाचाच

जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी टाकला बहिष्कार -  
रविवारी वितरीत होणाऱ्या यशोदामाता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमपत्रिकेतून नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना वगळण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपलवार यांच्यासह शिवसेनेच्या वतिने पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली असून या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व अन्य नेत्यांची नावे आहेत. मात्र, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे . खासदार पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मा सतपलवार यांच्यासह जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या सर्व सदस्यांनीही यशोदामाता पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे आज जाहीर केले.