शेगाव येथील गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी आजपासून खुले

दोन वर्षानंतर खुल्या वातावरणात भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन
Gajanan maharaj temple
Gajanan maharaj templeSakal

शेगाव - तब्बल दोन वर्षानंतर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर सर्व वयोगटातील भाविकांसाठी आज पासून खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी भक्तिभावाने व श्रद्धेने श्री संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले. राज्यामध्ये दोन वर्षापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य शासनाने राज्यभर यामध्ये विविध प्रतिबंध लावलेले होते. त्यामुळे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ई-पास काढूनच श्रींचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मार्च २०२० पासून ई-पास द्वारेच लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. मात्र, आता राज्यामध्ये कोरोना महामारी जवळ जवळ संपल्यामुळे २ एप्रिल पासून राज्य शासनाने कोरोना नियमांतर्गत सर्व प्रकारचे प्रतिबंध मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या निर्णयानंतर बुलडाणा जिल्हा प्रशासनाने सुद्धा तसे आदेश निर्गमित केल्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने ज्या भाविकांनी दर्शनासाठी अगोदरच १० एप्रिल पर्यंत ई दर्शन पास काढलेल्या होत्या. त्यांना नियमानुसार ई-पास द्वारेच १० एप्रिल पर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर ११ एप्रिल पासून १३ एप्रिल पर्यंत श्रींच्या मंदिरातील दर्शन व्यवस्था बदलण्या करीता तीन दिवस श्रींचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.

दर्शन व्यवस्था पूर्ववत केल्यानंतर १४ एप्रिल रोजी गुरुवारी सर्वसाधारण व सर्व वयोगटातील भाविकांसाठी श्रींचे मंदिर पहाटे पाच वाजता पासून उघडण्यात आले. मंदिराचे द्वार दर्शनासाठी उघडताच शेकडो भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. प्रखर उन्हाचा भाविकांना मंदिर परिसरात कोणताही त्रास होऊ नये याकरिता मंदिराच्या आतमध्ये सर्वत्र सावलीसाठी व्यवस्था करण्यात आली असून, पादत्राणे ठेवण्यासाठी सुद्धा उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात आली. श्रींच्या दर्शनानिमित्त बाहेरगावावरून शेकडो खासगी वाहनांमधून शेगावात आलेल्या भाविकांनी श्रींचे मंदिर परिसरात पाय ठेवताच हर्षोल्हास करीत संत गजानन महाराज की जय जय गजानन श्री गजानन असा जयघोष करीत श्रद्धेने व भक्तिभाव वातावरणात दर्शन घेतले. श्रींच्या मंदिर परिसरात चला माऊली चला माऊली चा गजर पुन्हा कानावर ऐकू येऊ लागला लागल्‍याने सर्व आनंदाचे वातावरण होते.

दर्शनाचे 'समाधान'

आज तब्बल दोन वर्षानंतर श्रींचे मंदीर दर्शनासाठी सर्वांसाठी खुले करण्यात आले. आज गुरुवारचा शुभमुहूर्त पाहून शेगावचे तहसिलदार समाधान सोनवणे यांनी बडेजावपणा न दाखविता रांगेत उभे राहून दर्शन घेतले. कोरोना संकटानंतर मंदीर पुर्ण खुले झाल्यानंतर सर्व सामान्य ''भाविक'' होउन दर्शन घेतल्याने समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com