Gajanan Nehale
sakal
पाचोड - वडीलाच्या निधनानंतर खचून न जाता स्वतः ला सावरत कधी किराणा दुकान चालवून तर कधी मोलमजुरी करून स्वतःसह आई व भावाची कौटुंबिक व शैक्षणिक जबाबदारी पार पाडून हर्षी (ता. पैठण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गजानन देवीदास नेहाले या सहशिक्षकाने प्रतिकूल परिस्थितीत केंद्रप्रमुखाच्या परिक्षेत राज्यातून २८ वा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सर्वप्रथम येवून इतरांसमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला.