
गेवराई : बीडचे एसपी नवनीत कॉंवत यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश दिल्याने सोमवारी रात्री गेवराईतील चकलांबा पोलिस गस्त घालत असताना एका शेतात जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.जवळपास साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.