esakal | VIDEO : कागदाच्या लगद्यापासून अशी करतात गणेशमूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

कागदापासून गणेशमूर्ती करताना.

अनिरुद्ध फाउंडेशनअंतर्गत भाविकांचा उपक्रम 

VIDEO : कागदाच्या लगद्यापासून अशी करतात गणेशमूर्ती

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद - रामनामाचा जप करण्यासाठी वापरातील कागदांचा लगदा तयार करून त्यापासून अनिरुद्ध फाउंडेशनअंतर्गत शंभर टक्‍के पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्तींना देण्यात आलेले रंगदेखील पूर्णपणे नैसर्गिक असल्याचे राजमल श्रीश्रीमाळी यांनी सांगितले. 

शहरात पाच ठिकाणी अनिरुद्ध उपासना केंद्रे आहेत. श्री अनिरुद्ध बापू यांचे श्रद्धावान रामनामाच्या वह्यांमध्ये राम नामाचा लिहून जप करतात. रामनाम जप वही लिहून पूर्ण झाल्यानंतर त्या वह्या उपासना केंद्रातून एकत्रित केल्या जातात आणि त्या मुंबईला पाठवल्या जातात. रामनामाने पवित्र झालेल्या वह्यातील कागदांचा लगदा तयार करून त्यापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात येतात. येथील सिडको टाऊन सेंटर भागात राजमल श्रीश्रीमाळी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य श्रीमती अनिता, नम्रता श्रीश्रीमाळी, पूजा संचेती, प्रशांत संचेती, अथर्व संचेती हे सर्वजण आपली नियमित कामे सांभाळून सेवाभावाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करतात. गेल्या पंधरा वर्षांपासून ते या माध्यमातून सेवा करत आहेत. राजमल श्रीश्रीमाळी यांनी सांगितले, की शहरात टाऊन सेंटर व ज्योतीनगर या दोन ठिकाणी बापूंचे श्रद्धावान गणेशमूर्ती तयार करतात. ही सेवा म्हणून करत असतो. बापूंचे भक्‍त तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बसवणाऱ्या गणेशमंडळांना या मूर्ती देत असतो. पर्यावरणपूरक म्हणजे फक्‍त शाडू मातीच्याच नव्हे, रामनामाचा कागद, साबुदाणा पीठ आणि व्हाइटनिंग पावडरच्या मिश्रणाने लगदा तयार केला जातो. लगदा व साचे मुंबईहून उपासना केंद्रातूनच पाठवले जातात. कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती शंभर टक्‍के पर्यावरणपूरक आहेत. या मूर्तींचे घरीच बकेटीभर पाण्यात विसर्जन करू शकतो. त्या लगेच विरघळतात. नऊ इंचांपासून दीड फुटापर्यंतच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. 

loading image
go to top