esakal | कष्टाने पिकवलेल्या शेतमालावर डल्ला मारणारी टोळी अखेर जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद : स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने शेतमाल चोरी करणाऱ्या टोळीला मुद्देमालासह पकडे.

पाच ते सातजण एका वाहनातून चोरीसाठी रात्रीची वेळ निवडायचे. कोणालाही वाहनाचा आवाज येऊ नये. यासाठी गोडाऊनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाहन थांबविले जायचे. विशेष म्हणजे पावलांचा आवाज येऊ नये. यासाठी सर्वजण रस्त्याच्या खाली उतरून शेतातून गोडाऊनच्या दिशेने जात असत.

कष्टाने पिकवलेल्या शेतमालावर डल्ला मारणारी टोळी अखेर जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद/कसबे तडवळे : शेतकऱ्यांचा शेतमालावर Farm Produce डल्ला मारणारी आठ जणांची टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना सोमवारी (ता.१४) यश आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन व्यापाऱ्यांचेही संगनमत असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वर्षभर मेहनत करून शेतकऱ्यांचा Farmer माल लंपास करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. पोलिस अधीक्षक राजतिलक रोषण Police Superidendent Rajtilak Roshan, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक करन माने, भुजबळ यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.सोयाबीनचे भाव वाढल्याने त्यालाही सोन्याची झळाळी लागली आहे. या झळाळीवर चोरट्यांची नजर बसली. अन जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात अनेक ठिकाणी सोयाबीन Soybean चोरीच्या घटना घडल्या. रात्रीच्यावेळी चोरी करण्याची अनोखी पद्धत असल्याने शेतकऱ्यांनी या टोळीची चांगलीच धास्ती घेतली होती.Gang Arrested For Stealing Agriculture Produce In Osmanabad District

हेही वाचा: Corona Updates : मराठवाड्यात ३९७ कोरोनाबाधित, २९ जणांचा मृत्यू

असे करायची चोरी

पाच ते सातजण एका वाहनातून चोरीसाठी रात्रीची वेळ निवडायचे. कोणालाही वाहनाचा आवाज येऊ नये. यासाठी गोडाऊनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाहन थांबविले जायचे. विशेष म्हणजे पावलांचा आवाज येऊ नये. यासाठी सर्वजण रस्त्याच्या खाली उतरून शेतातून गोडाऊनच्या दिशेने जात असत. कानोसो लागण्याच्या आतच १५ ते २० मिनिटांत ४० ते ५० कट्टे गाडीत टाकून तेथून पसार होत असत. सकनेवाडी (ता. उस्मानाबाद) येथील सुर्यातेज, वरुडा (ता. उस्मानाबाद) रस्त्यावरील ओडीएसएफ, येरंडागव (ता. कळंब) येथील शेतकरी, खामगाव (ता. उस्मानाबाद) येथील गणराज्य अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या Ganrajya Agro Producer Company गोडाऊनमधून या टोळीने सोयाबीन, हरभऱ्याचे कट्ट्यावर डल्ला मारला होता. याशिवाय जिल्ह्याच्या इतरही भागात ही टोळी कार्यरत होती. या टोळीतील दादा उद्धव चव्हाण, अनिल उद्धव चव्हाण, युवराज राजाराम काळे, महादेव सुरेश चव्हाण, विकास उद्धव चव्हाण (रा. राजेशनगर पारधी पेढी, ढोकी), आबा आप्पा शिंदे (रा. मोहा, ता. कळंब), अंकुश कल्याण शिंदे (इटकूर, ता. कळंब) Kalamb यासह सुधाकर जाधव व वैभव आप्पासाहेब आष्टेकर (रा. तेर, ता. उस्मानाबाद) Osmanabad या दोन व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहा लाख ६० हजार ६०७ रुपयांचा माल जप्त केला आहे.

वर्षभराची कमाई गायब करायचे

शेतकरी वर्षभर राबून शेतात विविध पिकांचे उत्पादन घेतो. विविध संकटाना सामना करीत शेवटी पिक हातात मिळते. मात्र चोरटे एकाच रात्रीत सर्व मेहनत पाण्यात घालत होते. सोयाबीनला भाव मिळाल्याने चोरट्यांनी सोयाबीन कट्टे लांबविण्याची जणू मोहिमच उघडली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यात चोऱ्या वाढल्या होत्या. पोलिसांनाही ही टोळी चांगलाच गुंगार देत होती. अखेर योग्य सापळा रचून पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले आहे. याशिवाय या टोळीला साथ देणाऱ्या दोन व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या टीमध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल ठाकूर, काझी, शेळके, सय्यद, चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल ढगारे, सर्जे, जाधवर, मरलापल्ले, आरसेवाड, आशमोड, चालक गव्हाणे, माने यांचा समावेश आहे.

हेही वाचा: उस्मानाबादचे आजी-माजी खासदार एकत्र! चर्चेला उधाण

माहिती मिळताच आम्ही कारवाईला सुरूवात केली. पहाटे तीन वाजता प्रथम काही जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर एक-एक करून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त केला आहे.

- करण माने, पोलिस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद.

एखादी व्यक्ती जर धान्य घेऊन केंद्रावर येत असेल तर त्याच्याकडे शेती आहे की नाही, याची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांना असते. अशी माहिती असतानाही भूमिहीन नागरिक शेतमाल घेऊन विक्रीसाठी येत असेल तर व्यापाऱ्याने माहिती घेणे गरजेचे असते. स्थानिक व्यापाऱ्यांनी मालाची खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल आहे की, चोरीचा याची खात्री करायला पाहिजे.

- गजानन घाटगे, पोलिस निरीक्षक, उस्मानाबाद.

loading image