अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

file photo
file photo
Updated on

परभणी : जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर घरफोडी, मोटारसायलकसह इतर वस्तू चोरणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता.१८) पोखर्णी नृसिंह (ता. परभणी) येथून मुस्क्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन मोटारसायलक जप्त करण्यात आल्या असून त्यांनी केलेल्या नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यातील चोरी, वाटमारी व इतर अवैध व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू असते. गुरुवारी (ता. १८) या पथकाला पोखर्णी नृसिंह (ता. परभणी) येथे चोरीच्या मोटारसायकलची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी पथक तयार करून पोखर्णी येथे सापळा रचला.

विविध ठिकाणी चोरी व घरफोडी केल्याचे कबुल

या ठिकाणाहून आरोपी अंकुश छगन ऊर्फ प्रभू शिंदे (वय ४२, रा. पोहंडूळ तांडा ता. सोनपेठ, जि. परभणी), शेख चांद ऊर्फ बबन शेख दादामिया (वय ३५, रा. तांबसवाडी, ता., जि. परभणी), गोपिचंद ऊर्फ भीमराव लक्ष्मण भोसले (वय ४५, रा. सुरपिंप्री तांडा, ता., जि. परभणी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत त्यांनी त्यांच्या अन्य साथिदारासह जिल्ह्यातील दैठणा व गंगाखेड पोलिस ठाण्यांतर्गत विविध ठिकाणी चोरी व घरफोडी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहायक पोलिस निरीक्षक शरद विपट, दिनेश मुळे, पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, आशा शेल्हाळे, जमिरोद्दिन फारोकी, हरिश्‍चंद्र खुपसे, भगवान भुसारे, किशोर चव्हाण, शंकर गायकवाड, अरुण पांचाळ, अरुण कांबळे, संजय घुगे, संजय शेळके यांनी केली.

नातेवाइकामार्फत चोरीचे साहित्य विक्री
अटक करण्यात आलेल्या चोरांची महिला नातेवाईक शिल्पाबाई अशोक पवार (वय ३५, रा. उमरी माळ्याची, ता., जि. परभणी) हिच्या मार्फत चोरीचे साहित्यांची विक्री केली जात असे. शिल्पाबाई पवार हिलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा : ऑनलाइन शिक्षणात अडचणींचा सामना


गंगाखेडच्या ‘डीवायएसपी’चेदेखील घर फोडले
या टोळीने गंगाखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे घर फोडून चोरी केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आहे. या टोळीला तपासासाठी दैठणा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना गंगाखेड येथील गुन्ह्यात गंगाखेड पोलिसांकडे हस्तांतरीत केले जाणार आहे.

चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
या आरोपींकडून पुन्हा घरफोडी, चोरी, जनावर चोरी, मोटारसायकल चोरी व शेतकऱ्यांच्या मोटार पंपाच्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यानुसार आमचा तपास सुरू आहे.
- प्रवीण मोरे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com