Ashadhi Wari 2025 : गंगागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Gangagiri Maharaj Dindi : गंगागिरी महाराज दिंडीने सराला बेट येथून पंढरपूरकडे पायी प्रवासाला प्रारंभ केला असून अडीच ते तीन हजार वारकरी सहभागी झाले आहेत. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत मार्गावर वृक्षारोपण सुरू करण्यात आले आहे.
महालगाव : श्रीक्षेत्र सराला बेट ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास शुक्रवारी सराला बेट येथे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सद्गुरू गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरीजी यांचे पाद्यपूजन करून मंदिर प्रदक्षिणा करत प्रारंभ करण्यात आला.