गंगाखेडला कोरोनाग्रस्तांचे अर्धशतक पार, तालुक्याची संख्या ५८ वर... 

corona
corona

गंगाखेड ः शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांने लग्नसोहळ्यानिमित्त स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास राजकीय, प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. या व्यापाऱ्याच्या परिवारातील ६० वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली असता तालुक्यातील रुग्णांची संख्या ५८ वर पोचल्यामुळे गंगाखेड शहरात कोरोनाग्रस्तांनी एका रात्रीत अर्धशतक पार केले आहे. 

गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा येथे मुंबई येथून आलेली महिला व शहरातील पूजा मंगल कार्यालय परिसरातील महिलांचे रिपोर्ट (ता.सहा) कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासनास खडबडून जाग आली. लग्नसोहळ्यानिमित्त स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन कोरोनाग्रस्त महिलेच्या परिवाराने केले होते. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून सदरील कार्यक्रमास राजकीय, प्रशासनातील अधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती. या महिलाच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करून यांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असता शनिवार (ता.अकरा) दुपारपर्यंत नऊ कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी गंगाखेड शहरात भेट देऊन कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली असता (ता.१२) रविवारी दुपारी १७ व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आल्या. यामुळे गंगाखेड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५८ वर पोचल्यामुळे तालुक्याची चिंता वाढली. 

सेलूतील फोफसे गल्लीत पुन्हा एक कोरोना बाधित
सेलू ः शहरातील फोफसे गल्लीत रहिवासी असलेल्या ४० वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल रविवारी (ता.१२) आला असून शहरातील पारीख कॉलनीमधील पॉझिटिव्ह आढळून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील आठ तर तालुक्यातील वालुर येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील १२ पैकी नऊ असे एकूण १७ जणांचे स्वॅब रविवारी (ता.१२) सायंकाळपर्यंत घेण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय हरबडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.एम.सोनवणे यांनी दिली. 
शहरातील पारीख कॉलनीमधील रहिवाशी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील आठ जण असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर संपर्कातील एकूण आठ व्यक्तींचे स्वॅब घेतल्याची माहिती डॉ.हरबडे यांनी दिली. तालुक्यातील वालुर येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेला  आपल्या मुलांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना बाधित आला असून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या रुग्णाच्या संपर्कात एकूण १२ जण आले असून पत्नी या रुग्णासोबत आहे. तर रुग्णवाहिकेचा चालक व मालक यांचे स्वॅब व उर्वरित नऊ जणांचे स्वॅब रविवारी (ता.१२) घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.एम. सोनवणे यांनी दिली.

जिंतूर येथील व्यक्ती नांदेड येथे पॉझिटिव्ह 
जिंतूर : तालुक्यातील कावी येथील एक ज्येष्ठ नागरिक प्रकृती बरोबर नसल्याने नांदेड येथे उपचारासाठी गेले अन् त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कावी येथील एक सत्तरवर्षीय ज्येष्ठ नागरिक पायाला जखम झाल्याने (ता.दोन) दोन जुलैला तालुक्यातील वाघी (धा.) येथे उपचारासाठी एका खासगी दवाखान्यात गेले होते. तेथील उपचारानंतर दुसऱ्या दिवशी (ता.तीन) परभणी येथील एका खासगी डॉक्टरकडे गेले असता त्यांनी अन्य एका दवाखानायत भरती होण्याचा सल्ला दिला. त्यावरून ते एका खासगी रुग्णालयात भरती झाले. तेथे शुक्रवारपर्यंत (ता.दहा) त्यांच्यावर उपचार करण्यात आले; परंतु प्रकृती जास्त खराब झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा स्वॅब तपासणी केली असता सोमवारी (ता.१३) स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. तो पॉझिटिव्ह आल्याने ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

रुग्णाच्या संपर्कातील सातजणांची ओळख पटली. 
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सदरील रुग्ण हा कावी गावातील असून, त्यांच्या बाहेरगावच्या प्रवासाची माहिती नाही. तरी रुग्णाच्या संपर्कात कोण कोण याची माहिती घेण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत सातजणांची ओळख पटली असून, वैद्यकीय पथकाद्वारे गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करून सॅनिटायझर फवारणी केली जाईल असे सांगितले.

(संपादन ः राजन मंगरुळकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com