गंगाखेडचे वास्तूवैभव भग्नावस्थेकडे; पुरातन विभागाचे दुर्लक्ष

पूर्वी सर्व ऐतिहासिक गावांना, गावकोस, टेहळणी बुरुज, वेशी होत्या. गंगाखेड हे देखील समृद्ध गाव, जहागिरदारीचे, पूर्वी गंगाखेडलाही पूर्ण गावकोस होता. त्याच्या खुणा आजही आहेत.
गंगाखेड ऐतिहासिक वास्तु
गंगाखेड ऐतिहासिक वास्तु
Updated on

गंगाखेड ( जिल्हा परभणी ) : अनेक प्राचीन शहरांपैकी गंगाखेड हे एक शहर होय. गंगाखेड शहरास ऐतिहासिक (heritage) पार्श्वभूमी लाभलेली आहे. जुन्या गंगाखेड शहरालगत गोदावरी नदीपात्राशेजारी (Gangakhed Godavari river) अनेक ऐतिहासिक वास्तू आजही तग धरुन उभ्या आहेत. पुरातन विभागाने या ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी करुन जतन करण्याची आवश्यकता आहे. (Gangakhed's- architecture- is- in- ruins- Neglect- of antiquity)

पूर्वी सर्व ऐतिहासिक गावांना, गावकोस, टेहळणी बुरुज, वेशी होत्या. गंगाखेड हे देखील समृद्ध गाव, जहागिरदारीचे, पूर्वी गंगाखेडलाही पूर्ण गावकोस होता. त्याच्या खुणा आजही आहेत. मोठा मारोती आणि चिंतामणी मंदिर जवळील व बालाजी मंदिरासमोर अजूनही बुरुज बऱ्या अवस्थेत आहेत. गावकोसला गोदावरी नदीकडून काही उपदरवाजे आहेत. पूर्वी गंगाखेडला सात वेशी होत्या असं म्हणतात. चिंतामणी मंदिरजवळील आणि जुन्या नगर परिषद इमारतीजवळील वेशी जीर्ण झाल्यामुळे पाडण्यात आल्या. आता फक्त उत्तर दिशेकडील पान वेस तग धरुन उभी आहे. या वेशीवर असंख्य झाडे झुडपे वाढलेली आहेत. वेस वरचेवर क्षीण होत आहे. कधी कोसळेल याची शाश्वती कोणासही देता येत नाही. त्यामुळे आवश्यकता आहे ती पुनर्बांधणीची व ऐतिहासिक वारसा यांचे जतन करण्याची. यासाठी गरज आहे लोकचळवळी. शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन होण्यासाठी सवंगडी कट्ट्याचे प्रा. प्रकाश धन नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या भूमिकेस शहरवासीयांसह लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देण्याची व लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा शहरातील ऐतिहासिक वास्तु नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा - सोशल मीडियामध्ये रामदेवबाबांच्या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

गंगाखेड शहर हे ऐतिहासिक शहर असून हे गाव गोदावरी नदीवर मध्य नाडी म्हणजे मध्यात आहे ,सुपीक भु प्रदेश ,निझाम संस्थान च्या वतीने हैबती राजे राजेंद्र यांनी पराक्रम केल्यामुळे गंगाखेड सह ७ गावाची जहागिरी त्यांना देण्यात आली. गावाला पूर्ण गावकोट सात वेशी सह होता. तसेच प्रत्येक दिशेष एक टेहळणी बुरुज होते. त्यापैकी आता दोन वेशी, तीन बुरुज जीर्ण अवस्थेत कसे बसे टिकून आहेत. चिंतामणी बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर "विरगळ "आहे. साधारण १६ व्या शतकातील हे बांधकाम असावे, गावाला संरक्षीत भिंत असा याचा उपयोग होता. आता मोठ्या मारोती समोरील आणि उत्तरेकडील पान वेस जीर्ण अवस्थेत टिकून आहे.

ऐतेहसिक (heritage )वास्तू आहेत. वारसा म्हणून जतन करणे आवश्यक आहे. केवळ त्याच्या अंगावर असलेल्या वेली, झाडे,झुडपे काढून डाग डुगी करायची आहे.यासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळ, पुराण वस्तू सवंर्धन कार्यालय, नगर परिषद ,खासदार आमदार यांच्या स्थानिक विकास निधी ,लोक सहभाग यातून डाग डुगी आणि सुशोभी करणं होऊ शकते.

- प्रा. प्रकाश घन, सवंगडी कट्टा, गंगाखेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com