Court
sakal
- राजेंद्र व्यास
गंगापूर - गंगापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निकाल देत, अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करणाऱ्या ४६ वर्षीय नराधमाला दोषी ठरवून ७ वर्षे सश्रम कारावासाची आणि दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. तसेच, तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियमावलींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.